लोक विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

38

ब्रह्मपुरी : दि रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी द्वारा संचालित लोक विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गांगलवाडी येथे थोर समाजसुधारक, शिक्षणप्रेमी, शेतकरी हितैषी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 199 वी जयंती साजरी करण्यात आली.

.     कार्यक्रमाचे सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य . एस. आर.बुरडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक वाढई, दोनाडकर, मोहुरले, हांडेकर, जुमनाके, रामटेके, नरुले, शहारे, प्रा. राऊत, प्रा. नागमोती, प्रा. मेश्राम, प्रा .राऊत, प्रा. मेश्राम, युवा प्रशिक्षक गजबे, धोटे, तांगडे, तलमले इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.    कार्यक्रमाप्रसंगी पद्माकर रामटेके यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना त्यांच्या समाज सुधारणेतील योगदानाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जुमनाके यांनी पार पाडले.