Home सामाजिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कला व हस्तकला प्रदर्शनी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कला व हस्तकला प्रदर्शनी

985

भद्रावती : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त भव्य कला व हस्तकला प्रदर्शनी दि. १२ ते १४ एप्रिल २०२५ ला कम्युनिटी हॉल, ओ.एफ.चांदा, भद्रावती येथे आयोजित करण्यात आली आहे.

.        या प्रदर्शनात चित्रे, कलाकुसर, मातीची कला, शिल्पे, लाकडी कलाकुसर, भित्तीचित्रे आणि सर्व प्रकारच्या कलाकृती प्रदर्शनात ठेवल्या जातील. विविध क्षेत्रातील कलाकृती एकाच व्यासपीठावर प्रदर्शित करण्यासाठी आणि कलाकारांचे उत्तम विचार पुढे आणण्यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

.         सर्व कलाकारांनी आपल्या कलाकृती या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यासाठी १० एप्रिल २०२५ पर्यंत आपली नावे स्वप्नील खोब्रागडे, पियुष कांबळे यांचकडे नोंदवावीत असे आवाहन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि तथागत गौतम बुद्ध जयंती उत्सव समिती-२०२५ यांच्याकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!