डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे सुयश

47

ब्रह्मपुरी : सन 2024 25 मध्ये राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ब्रह्मपुरी येथील सात विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेले असून त्यापैकी मानव नितेश टेंभुर्णे या विद्यार्थ्यांची एकूण 48 हजार रुपये शिष्यवृत्ती करता निवड झालेली आहे.

.      या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी चार वर्ष वार्षिक 12 हजार प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. देवेश कांबळे, मुख्याध्यापक टि. जी. चाचरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केले आहेत. उपरोक्त यशाचे श्रेय विद्यार्थ्याने आई वडील, मार्गदर्शक शिक्षक यांना दिले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखल्याचे बोलल्या जात आहे.