Home सामाजिक लोकमान्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

लोकमान्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

1018

वरोरा : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही लोकमान्य महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दि. 28 मार्च ला सकाळी 11 वाजता करण्यात आले होते.

.     यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून लोक शिक्षण संस्था वरोडा अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून प्रा. यामिनी नन्नावरे हे उपस्थित होते.

.     याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा. श्रीकांत पाटील यांनी माजी विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे संबंध हे निरंतर चालणारे आहे व त्याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे असे सांगून महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्यातील वेगवेगळ्या योजना च्या माध्यमातून ते संबंध कसे जोपासावे याबद्दल मार्गदर्शन केले. तर डॉ. जयश्री शास्त्री यांनी माजी विद्यार्थी व महाविद्यालय यांच्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला व मार्गदर्शन केले.

.      या कार्यक्रमाचे संचालन डॉ. रवींद्र शेंडे यांनी केले तर प्रस्ताविक डॉ. श्रीनिवास पिलगुलवार यांनी केले व आभार डॉ. दीपक लोणकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयाचे बरेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!