नेचर फाऊंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य कार्यशाळा

30

नेचर फाउंडेशन नागपूरचा ‘ग्लोबल लिंक’ उपक्रम 

चिमूर : कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट परीक्षेचे फार्म आणि एकूणच सर्व प्रक्रियेची माहिती चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वर्धा जिल्हातील विद्यार्थांना व्हावी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या विद्यापीठापर्यंत जावे. याकरिता नेचर फाऊंडेशन मागील 4 वर्षापासून विदर्भातील ग्रामीण भागात प्रयत्न करीत आहे. नेचर फाऊंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य कार्यशाळा चे आयोजन केले होते.या कार्यशाळेला नागभीड, चिमूर, वरोरा, समुद्रपूर, भिवापूर तालुक्यातील तर नागपूर पासून तब्बल १००हून अधिक १० वी,१२ वी व पदवी चे विध्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

.     या कार्यशाळेची मुख्य भूमिका ग्रामीण भागातील दहावी, बारावी व पदवीच्या विद्यार्थ्यांना नागपूर, पुणे, मुंबई शहरातील नामांकित विद्यापीठांमध्ये कॉलेजमध्ये मोफत प्रवेश प्रक्रियेपासून राहण्याची मोफत व्यवस्था होतपर्यंत व पुढील जीवनात ध्येयाप्रती वाटचालीस मदत करेपर्यंत जबाबदारी घेण्याचे काम नेचर फाउंडेशनचे संस्थापक निलेश नन्नावरे यांनी घेणार असे वचन दीले.

.     नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून नामांकित विद्यापीठातील सामान्य क्षमता चाचणीचे ऑनलाइन क्लासेस चालवले जाते.याच माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे निरसन करण्यात आले.