राजुरा : तालुक्यातील श्रीगुरुदेव सेवा मंडळ पाचगावचे सेवकांनी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद व सांगडी गावकरी आयोजित आंतरराज्यीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन सांगडी तेलंगाणा राज्यात सहभागी होवून राष्ट्रसंत ग्रंथदिंडी मध्ये सहभाग दर्शविला,त्यानिमित्ताने झालेल्या सन्मानपत्र वितरणाचा कार्यक्रम पाचगाव येथे आयोजित करण्यात आला.
. यावेळी अध्यक्षस्थानी ॲड. राजेंद्र जेनेकर केद्रिय सरचिटणीस राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद होते, प्रमुख अतिथी म्हणून लटारु मत्ते मध्यवर्ती प्रतिनिधी गुरुकुंज, सुभाष पावडे तालुकाप्रमुख ग्रामगीता परिक्षा विभाग, मनोहर बोबडे ग्रामगीता परिक्षा विभाग, पांडुरंग शेंडे तालुका प्रचारक देवाडा, रामचंद्र मोरे भजनप्रमुख, गोपाल जंबुलवार सामाजिक कार्यकर्ते, संतोष खाडे, रुपेश गेडेकर अध्यक्ष शाळा समीती, अनुराग शेंडे, मिलींद कुमरे, लक्ष्मण शेंडे, दिपक चेन्नुरवार देवाडा आदींची उपस्थिती होती.
. यावेळी पांडुरंग शेंडे यांनी प्रचारकार्याचा अहवाल मांडला, सुभाष पावडे यांनी ग्रामगीता परिक्षेसंबंधी, लटारु मत्ते यांनी मंडळाचे संघटनबाबत मार्गदर्शन केले, ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार व प्रसारकार्य, संमेलनात महाराष्ट्रातील 350 सेवकांनी सहभाग घेतला, तेलगू भागात राष्ट्रसंताचे प्रचारकार्य केल्याबाबत सांगडीवासियांचे कौतुक केले, यावेळी रामचंद्र मोरे, किसन पाल, सुरेश तलांडे, गंगाधर गेडेकर, विठ्ठल तलांडे, मारोती घ्यार, बंडू पुरवटकर, उषाबाई मोरे, धुर्पदाबाई तलांडे, त्रिवेणा खाडे, मिना आदे, पार्वता तलांडे, विठाबाई पुरवटकर, सुगंधा पुलगावकर, अंजना भोयर, मालन पाल,बेबी बदखल, शोभा गेडेकर, शंभू कोवे यांना “संमेलनाचे सन्मानपत्र” व रुपेश गेडेकर यांची शाळा समीतीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच सामाजिक कार्यकर्ते गोपाल जंबुलवार यांना “राष्ट्रसंत साहित्य” देवून सन्मानीत करण्यात आले, उपस्थितांनी श्री गुरुदेव सेवा मंडळ पाचगाव व सांगडी वासियांचे आभार मानले.


