दुध उत्पादक शेतकरी व पशुपालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
वरोरा : एसपीजेएमआर – डीओसीसी, एम ३ एम फाउंडेशन आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, केंद्र पुरस्कृत ॲस्कॅड योजना पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 खेमजई आणि ग्राम पंचायत खेमजई यांच्या सयुंक्त विद्यमाने खेमजई येथे एक दिवसीय प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व कार्यमोहीम शिबिर पार पडले.
. या कार्यक्रमाचे उद्घाटन गोपूजन करून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे चंद्रपूर यांनी केले तर अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता डॉ. प्रमोद गंपावार होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हीरूडकर जिल्हा परिषद चंद्रपूर, सहाय्यक आयुक्त डॉ. दिलीप देशमुख वरोरा, भद्रावती , चिमूर सहाय्यक आयुक्त डॉ. सुचिता धोंडे तालपची राजुरा, सरपंच मनीषा चौधरी ग्रामपंचायत खेमजई, उपसरपंच चंद्रहास मोरे, ज्येष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठान नागपूर डॉ मानकर, डॉ. गोरिले, डॉ. भदाडे, डॉ कढाने, डॉ.राऊत, वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील डॉ.सारीपूत लांडगे, प्रा. विस्तार शिक्षण डॉ. महेश जाळवे, डॉ जल्लेवर, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर धोत्रे, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर अनुप नाफडे, प्रशांत धमाळ कन्सल्टंट नाबार्ड पुणे, सतीश चव्हाण कन्सल्टंट नाबार्ड, डॉ. सतीश अघडते पशुधन विकास अधिकारी खेमजई, कृषी विकास प्रकल्प समन्वयक अधिकारी भूमेषकुमार तांडेकर, रमेश चौधरी यांची उपस्थिती होती.
. या कार्यक्रमात वरोरा तालुक्यातील शेगाव, मेसा , धानोली ,भटाळा ,आसाळा , सालोरी ,बोरगाव देशपांडे, बांद्रा, बिजोणी, अर्जुनी, वायगाव भोयर, माढेळी, ताडगव्हाण, चारगाव खू, पोहा, अर्जुनी, पेवरा, येन्सा, कोतबाळा क्षेत्रातील दुध उत्पादक शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात शस्त्रक्रिया व कार्यमोहीम शिबिराचे आयोजन करून मोठ्या जनावरांना चौखुऱ्याचे लसीकरण, गर्भ तपासणी ,वंधत्व तपासणी, कुत्र्यांना अँटी रेबीज लसीकरण व खरूज वरील औषधोपचार, बैलांच्या शिंगाचे, डोळ्याचे व रिंगणीचे ऑपरेशन, कुत्र्याच्या कानावरील शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शिबिराकरिता ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान नागपूर व महाव्हेट चंद्रपूर येथील तज्ञ सर्जन डॉक्टरांनी मोलाचे योगदान दिले.
. कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प अधिकारी अनिल पेंदाम यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. सतीश अघडते पशुधन विकास अधिकारी अधिकारी, खेमजई तर आभार प्रदर्शन वैभव चौधरी यांनी केले. या कार्यक्रमात गोपाल राठोड, ईश्वर हजारे, अविनाश तुराणकर, मयूर दडमल, शेखर धाबेकर, अनिकेत हिवरे, प्रमोद गायकवाड, रोशन मानकर, प्रबुद्ध डोये, शैलेंद्र वराडे, युगांत चौधरी मनीष चौधरी यांनी सहकार्य केले.


