भद्रावती : इनरव्हील क्लब ऑफ भद्रावतीची ओसिवी (ऑफिशियल क्लब व्हिजिट) बैठक रविवार दि. २३ मार्च ला इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रेमा पोटदुखे यांच्या निवासस्थानी उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी क्लबच्या सामाजिक प्रकल्पाअंतर्गत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात सॅनिटरी वेंडिंग मशीनचे वितरण करण्यात आले.
. या उपक्रमाचे उद्घाटन इनरव्हील क्लबच्या जिल्हाध्यक्ष जयश्री पोफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर मोते, प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार, प्रा. माधव केंद्रे, प्रा. प्रेमा पोटदुखे, दोडके व बांदुरकर हे मान्यवर उपस्थित होते.
. या उपक्रमासाठी प्रायोजक म्हणून रोटेरियन सुनील पोटदुखे व धनराज आस्वले यांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थिनींच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या प्रकल्पाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
. कार्यक्रमाच्या आयोजनात इनरव्हील क्लबच्या किर्ती गोहाणे, रश्मी बिसेन, वर्षा धनोरकर, मनिषा ढोमणे, विभा बेहरें, वैशाली सातपुते, राजेश्री बत्तीनवार, कविता सुफी, विश्रांती उराडे, स्वाती चारी व त्रिशा नंदेश्वर यांनी विशेष सहभाग घेतला. या उपक्रमामुळे महिला आरोग्यविषयी जागरूकता वाढीस लागेल आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


