माजी विद्यार्थी हे शाळेतील सुवर्ण वैभव – डॉ. जयंत वानखेडे
शालेय जीवनातील स्मृती जागृत झाल्या – प्रफुल्ल चटकी
भद्रावती : शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचलित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे शनिवार दिनांक २२ मार्च ला माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या माजी विद्यार्थी मेळाव्याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला व आपल्या भावना व्यक्त केल्या.
. यशवंतराव शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या वतीने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त माजी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी तथा माजी नगरसेवक प्रफुल चटकी, माजी नगरसेवक राजू सारंगधर, प्राचार्य डॉ सुधीर मोते हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन झाली.
. माझी विद्यार्थी मिळाव्यात मार्गदर्शन करताना संस्थेचे विश्वस्त तथा माझी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माजी विद्यार्थी हे या शाळेचे वैभव आहे. आपण अनेक क्षेत्रात उत्तम व्यक्तिमत्व म्हणून काम करत आहात याचा आम्हाला अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रफुल्ल चटकी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील स्मृतींना उजाळा मिळाला व अनेक मित्र या ठिकाणी पुन्हा एकदा भेटले त्यांच्याशी संवाद साधून आत्मिक समाधान झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.
. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्राध्यापक रमेश चव्हाण, प्राध्यापक जुमडे, चौधरी तसेच सर्व शिक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांनी सत्कार, सन्मान केला.
. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.


