Home सामाजिक शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे महिला दिनानिमित जनजागृती रॅली

शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे महिला दिनानिमित जनजागृती रॅली

1066

गडचिरोली : महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे महिला दिनानिमित जनजागृती रॅली काढण्यात आली.

.     दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. याच दिनाचे औचित्य साधून निर्माणच्या पुढाकाराने 8 मार्च 2025 आज जिल्ह्यातील शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे महिला दिनानिमित भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

.    या रॅलीची सुरुवात शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली ते इंदिरा गांधी चौक अशी होती. विद्यार्थ्यांनी हातामध्ये महिला दिनाचे पोस्टर घेऊन, उत्साहाने घोषवारे दिले. नारी तू महान, विश्वाची आहेस शान अशी घोषणा देऊन साऱ्याचा उत्साह वाढविला. विद्यार्थ्यांनी या रॅलीला आनंदात सहभाग नोंदविला. यावेळेस गडचिरोली पोलिस अधिकारी व कर्मचारी,  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत जाकी तसेच प्राध्यापक, विद्यार्थी आणि निर्माणमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.      महिलांविषयी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कविता तसेच आजची महिलांची परिस्थिती याबद्दल कवितांचे सादरीकरण देखिल केले. महिला सुरक्षा व महिलांवर वारंवार होणारे अत्याचार यावर गडचिरोली महिला पोलिसांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

error: Content is protected !!