Home सामाजिक महिला सक्षमीकरण काळाची गरज!

महिला सक्षमीकरण काळाची गरज!

1097

“मातृदेवो भव “ असे संस्कृत सुभाषित स्त्री ची महती सांगते. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. अनेक भारतीय स्त्रियांनी हाल अपेष्टा सहन करत अनेक आव्हाने स्वीकारत आपले ध्येय व कार्य पूर्ण केले. महिला सक्षमीकरण म्हणजे नेमके काय ? याबद्दल प्रत्येक स्त्रीने जाणून घेतले पाहिजे. आपले आयुष्य जगताना आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तरच सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. प्रत्येक स्त्री ही कर्तृत्ववान असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये ती आपला ठसा उमटवत आहे. कुठल्याही क्षेत्रात ती मागे नाही. परंतु आपल्या समाजास स्त्री पुरुष समानता हे पाडल्या जात नाही. स्त्री जेव्हा आपले आयुष्य बाय चॉईस किंवा बायचान्स निवडते. यावरच सक्षमीकरण महत्त्वाचे ठरते. जर स्त्री ही होम मेकर असेल व ती तिच्या कामामध्ये आनंदी असेल तर ती स्वतःसाठी वेगळा विचार करू शकते. आणि नोकरी करणारी असेल तर घरची जबाबदारी व ऑफिशियल जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाळीत असेल व आनंदी असेल तर ते एक प्रकारचे सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण ही हे एक काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गट, उमेश सारख्या प्रकल्पाच्या सहाय्यातून सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करू लागल्या आहे. परंतु या विचारांच्या प्रगल्भतेसाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास घडू शकते व प्रगल्भ विचार व्यक्त करता येतात स्त्रीला स्वतः सक्षम बनायचे असेल व आपल्या समोरच्या आव्हानांना तोंड देऊ शकेल यासाठीच प्राथमिक शिक्षणात व्यक्तिमत्व विकास, लैंगिक शिक्षण, स्वरक्षण इत्यादी बाबींचा समावेश असला पाहिजे. यासाठीच नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये या सर्व बाबींचा विचार केला आहे. व यातून एक सक्षम महिला घडविण्याचा प्रयत्न केला आहे.

उज्वला प्रवीण खिरटकर,
मुख्याध्यापिका, जि. प. उ. प्रा. शाळा कचराळा.

 

error: Content is protected !!