बल्लारपूर येथे पार पडली व्हॉलीबॉल स्पर्धा
महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील १८ संघाचा सहभाग
बल्लारपूर : दि नॅशनल इन्स्टीट्यूट शोसल साइंस अंड टेक्नॉलॉजी असोसिएशन बल्लारपूर च्या वतीने पंडित दिनदयाल वॉर्डातील नवयुवक कल्याण मंडळाच्या मैदानावर आमदार चषक व्हॉलीबॉल स्पर्धा शनिवार व रविवार ला पार पडली. यामध्ये महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील तब्बल १८ व्हॉलीबॉल संघानी सहभाग घेतला. बल्लारपूर येथील आमदार चषक वरोरा येथील स्फुर्ती स्पोर्ट्स क्लब ने पटकावित अव्वल स्थान मिळविले. उपविजेतेपद तेलंगणा येथील व्हॉलीबॉल संघानी प्राप्त केले.
. बल्लारपूर येथे आयोजित आमदार चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन माजी वन मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष हरिश शर्मा, शहर महासचिव मनिष पांडे, समीर केने, प्रमोद आवते, प्रकाश दोतपल्ली, रेणुका दुधे, श्रिनीवास पियार, श्रीनिवास चेरुकुटला आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
. आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, खेळाला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. कोणतेही क्रीडा क्षेत्र अपवाद राहू नये, हा आपला मानस आहे. जिल्ह्यातील क्रीडापटूनी प्रत्येक क्रीडा प्रकारात नावलौकीक करावा.याच अनुषंगाने व्हॉलीबॉल स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून व्हॉलीबॉल पटूनी आपापले कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळाली आहे, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगून शुभेच्छा दिल्या.
. येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील १८ व्हॉलीबॉल संघानी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये वरोरा येथील स्फुर्ती स्पोर्ट्स क्लब ने प्रथम स्थान पटकावित ४0 हजार रुपये रोख व आमदार चषक मिळवला. तेलंगणा राज्यातील खम्मम येथील व्हॉलीबॉल संघाने दुसरे स्थान पटकावून 30 हजार रुपये प्राप्त केले.तिसरे बक्षीस सुरजागड येथील व्हॉलीबॉल संघाने मिळवून २0 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी श्रीनिवास पिसार, नारायण सुक्कु, प्रताप आसेपल्ली, सतीश बांकुरी, श्रीनिवास मासे, मोहम्मद इस्माईल आदींनी सहकार्य केले.


