Home सामाजिक भटाळीत 28 फेब्रुवारीला विविध विकास कामांचे लोकार्पण

भटाळीत 28 फेब्रुवारीला विविध विकास कामांचे लोकार्पण

1133

सुप्रसिद्ध ह.भ.प. सत्यपाल महाराज यांचे किर्तन

चंद्रपुर : लोकसहभाग व शासनाच्या विविध निधीमधून भद्रावती तालुक्यातील भटाळी या गावात शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी ला सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थित लोकार्पन सोहळा संपन्न होणार असून संध्याकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध ह.भ.प. सत्यपाल महाराज यांचा जाहीर किर्तन व प्रवचन तथा अपंग व्यक्तींना 3 चाकी सायकलचे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.

.     या लोकार्पण सोहळ्याला उद्घाटक म्हणून गृहनिर्माण, शालेय शिक्षण, राज्यमंत्री गृह (ग्रामीण) ना. पंकज भोयर राहणार तर अध्यक्षस्थानी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, वरोरा भद्रवती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद चंद्रपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर चे अध्यक्ष संतोषसिंग रावत, वरोरा उपविभागीय अधिकारी झेनित चंद्रा, वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी नयोनी साटम, महावितरण कंपनी जि. चंद्रपूर च्या अधीक्षक संध्या चिचंडे, तहसिल कार्यालय भदावती चे तहसिलदार राजेश भांडारकर, संवर्ग विकास अधिकारी डॉ. आशुतोष सपकाळ, जि. स्टोन केशर अशोसिऐशन अध्यक्ष, श्रीमती. चंद्रभागाबाई ना. वासाडे मेमोरियल सोसायटी चंद्रपूर चे चंद्रकांत ना. वासाडे, जिल्हा मध्यवती सहकारी बँक चंद्रपुर चे माजी संचालक रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ता मुकेश जिवतोडे, सामाजिक कार्यकर्ता अहेतेशाम अली, सामाजिक कार्यकर्ता मुनाज शेख, सामाजिक कार्यकर्ता विलास नेरकर, जिल्हा मध्यवती सहकारी बँक चंद्रपुर चे माजी अध्यक्ष शरद जिवतोडे, सामाजिक कार्यकर्ता प्रा. राजेंद्र ताजने, ग्रामपंचायत भटाळी चे उपसरपंच दिपक मडावी, तंटामुक्त अध्यक्ष विलास सातपुते, पोलिस पाटील भाग्यश्री हिरादेवे, जि.प. शाळा भटाळी चे मुख्याध्यापक मोतीलाल झाडे, जि.प. शाळा नंदोरी खुर्द च्या मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ता भास्कर तुमराम, सेवा सहकारी संस्था भटाळी चे अध्यक्ष दिवाकर नन्नावरे उपस्थित राहणार आहेत. यात सत्कारमूर्ती म्हणून जि. स्टोन केशर अशोसिऐशन नंदोरी चे अध्यक्ष चंद्रकांत वासाडे, जैन मेटल नंदोरी चे नरेशचंद्र जैन, मनियार अँड कंस्ट्रक्शन नंदोरी चे अभिजीत मनियार, लक्ष्मीचंद्र लॉजिस्टीक स्टोन क्रेशन नंदोरी चे उज्वल नथानी, स्मृती ओम कंस्ट्रक्शन नंदोरी चे के.व्ही.डी.एस. प्रसाद, श्री. सई असोसिएशन कंपनी चे मुन्ना वर्मा, बांगडे स्टोन क्रेशर नंदोरी चे विनायक बांगडे, संचैती कंस्ट्रक्शन नंदोरी चे राजेंद्रकुमार संचैती, मा शारदा स्टोन क्रेशर नंदोरी चे रूपल रावत, खोके कांक्रिट प्रोडक्ट नंदोरी चे सचिन खेके यांचा सत्कार होणार आहे.

.          या कार्यक्रमाला आपण सहपरीवारसह उपस्थित राहावे असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळ भटाळी, श्रीराम क्रिडा मंडळ भटाळी, ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी तसेच सर्व क्रिडा मंडळ, ग्रामपंचायत भटाळीचे सरपंच सुधाकर रोहणकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!