Home सामाजिक आनंद निकेतन महाविद्यालयात पालक शिक्षक मेळावा

आनंद निकेतन महाविद्यालयात पालक शिक्षक मेळावा

1082

वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालयात पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन दिनांक 21 फेब्रुवारी रोज शुक्रवारला करण्यात आले होते. शिक्षक आणि पालक यांच्यात कुठेतरी संवाद साधावा या हेतूने दरवर्षी आपण पालक मेळाव्याचे आयोजन करतो.

.      या कार्यक्रमाला अनेक पालकांनी आपली उपस्थिती दर्शवली. बऱ्याच पालकांनी आपल्या पल्ल्याला येणाऱ्या अडचणी बोलून दाखवल्या आणि त्या अडचणींची निराकरण शिक्षकांनी योग्य रीतीने केले. वाचनालयात स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची संख्या वाढवावी अशी सूचना पालकांनी केली. आणि त्यांच्या या समस्येचे निराकरण ग्रंथपाल माननीय साबळे सरांनी केले.

.      कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काळे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कमी झालेल्या पटसंख्येची चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी पालकांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे हे त्यांनी पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्य विकास करण्यासाठी महाविद्यालयात अनेक उपक्रम राबवले जातात अशी माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या पाठीशी नेहमी उभे आहे असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मृणाल काळे होते. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. कल्पना काळे यांनी केले तर उत्कृष्ट असे संचालन प्रा. प्रियंका भुक्या यांनी केले.

.     या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. हेमंत परचाके यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालक शिक्षक समितीतील सर्व सहकाऱ्यांनी फार सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पालकांना संपूर्ण महाविद्यालय वाचनालय क्रीडा विभाग हे दाखवण्यात आले. पुढच्यावेळी आम्ही पालक सभेला येऊ असे अनेक पालकांनी आश्वासन दिले. आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

error: Content is protected !!