बल्लारपूर : बल्लारपूर तहसील, तालुका कृषी कार्यालय यांच्या वतीने विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार (दि. २१) सकाळी ८ वाजता शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ तयार करण्याच्या अनुषंगाने विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
. अग्रिस्टक योजनेत शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्यात यावा. शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांसाठी लाभान्वित करण्यासाठी विसापूर येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित शिबीरात मार्गदर्शन करण्यासाठी तहसिलदार सतीश साळवे, कृषी अधिकारी यु.एम.डिकळे व महसूल अधिकारी आरती दुलत उपस्थित राहून शेतकऱ्यांची ‘फार्मर आयडी’ तयार करून घेणार आहे. शेतकऱ्यांनी यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.


