Home सामाजिक जगन्नाथबाबा पाखकी सोहळ्याने हडस्ती दुमदुमली

जगन्नाथबाबा पाखकी सोहळ्याने हडस्ती दुमदुमली

1110

हजारो भाविकांनी घेतले दर्शन

टाळ मृदंगासह ४0 भजनांचा सहभाग

बल्लारपूर : तालुक्यात शेवटच्या टोकावर वर्धा नदीच्या तिरावर हडस्ती गाव आहे. येथील जगन्नाथबाबा मंदिर समितीच्या माध्यमातून जगन्नाथबाबा मुर्ती स्थापना दिनाच्या औचित्याने आणि मारोती महाराज यांच्या प्रकट दिन हर्षोत्योसव नुकताच साजरा करण्यात आला. जवळपास ४0 भजन मंडळाने पालखी मिरवणूकीचे सारथ्य टाळ मृदंगासह केले.यावेळी पंचक्रोशीतील हजारोवर भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खरे म्हणजे हडस्ती गाव जगन्नाथबाबा पालखी सोहळ्याने दुमदुमले होते.

.      बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती गावात मागील अनेक वर्षापासून जगन्नाथबाबा मुर्ती स्थापना व मारोती महाराज प्रकट दिन साजरा करण्याची परंपरा आहे. यासाठी पंचक्रोशीत हडस्ती गावाचा नावलौकीक आहे. जगन्नाथबाबा पालखी सोहळा निमित्त गावाला जत्रेचे स्वरूप दिवसेदिवस येत आहे. पालखीचे हजारो भाविक दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण व्हावी जगन्नाथबाबाला साकडे घालतात. या दरम्यान एका सजवलेल्या बैलगाडीतून जगन्नाथबाबा मुर्तीची व मारोती महाराज यांची पालखी मिरवणूक काढली जाते. जगन्नाथबाबाच्या जयघोषात पालखी मिरवणूक आयोजित केली जाते.यावेळी गावात उत्साह असतो.यानिमित्त दिवाळी सणाची प्रचिती येते.

.      जगन्नाथबाबा पालखी चे ठिकठिकाणी भाविकांकडून औक्षण केले जाते.टाळ मृदंगासह भजन मंडळे भक्ती भावाने पालखी चे सारथ्य करत असते. भक्तीमय वातावरणात महाप्रसाद कार्यक्रमाने दोन चालणाऱ्या जगन्नाथबाबा मुर्ती स्थापना व मारोती महाराज प्रकट दिनाचा समारोप करण्यात आला.

संगीत रजनी कार्यक्रमाने भाविक भक्ती रसात रंगले                                                                                                                          अवघ्या सहाशे लोकवस्तीच्या हडस्ती गावात पालखी मिरवणूक सोहळ्यानंतर जगन्नाथबाबा मंदिर समितीच्या पदाधिकार्यांनी यंदा मां कामाक्षी म्युझिकल ग्रुप, नागपूर येथील कलावंतांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम घेतला. संगीत रजनी कार्यक्रम दरम्यान भाविक भक्ती गीतात तल्लीन झाले. भक्ती गीताच्या माध्यमातून भक्ती रसात रंगले. तत्पूर्वी कायर पिपरी येथील खेमराज महाराज, हिरापूर येथील वामन महाराज व कोसारा येथील मोरेश्वर महाराज यांनी जगन्नाथबाबा यांच्या जीवन कार्यावर कीर्तनातून भाविकांना अवगत केले.

error: Content is protected !!