Home सामाजिक विद्यार्थ्यांनी जाणून घेतले बॅकेचे व्यवहार !

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले बॅकेचे व्यवहार !

1129

 भद्रावती : यशवंतराव शिंदे विद्यालयातील वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी भद्रावती दर्शन या सदराखाली स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला भेट देऊन बँके विषयीची माहिती मिळवून घेतली. बँकेचे मॅनेजर चेतन भिसे, अभिजीत दोडके तथा विजय तेलंग गार्ड यांनी विद्यार्थ्यांना बँकेविषयी माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भद्रावती मधील प्रसिद्ध ग्राम उद्योग संघाला भेट दिली.

.       यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध साहित्य कसे बनवले जातात याविषयी माहिती जाणून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भद्रावती मध्ये प्रसिद्ध जैन मंदिर, नाग मंदिर व गणेश मंदिर या ठिकाणी भेटी दिल्या. गणेशाचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी तिथेच भोजन केले. यावेळी विद्यार्थ्यानी भद्रावती दर्शन ए. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. या भद्रावती दर्शनासाठी विद्यार्थ्यांना डॉ कार्तिक शिंदे यांनी स्कूलबस उपलब्ध करून दिले तर प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी विद्यार्थ्यांना भद्रावती दर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था प्रमोद तेलंग व नंदाताई यांनी केली. या भेटीदरम्यान सर्व विद्यार्थी आनंदित झाले विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!