चिमूर : स्वच्छ भारत मिशन, जल जिवन मिशन व माझी वसुंधरा अंतर्गत महास्वछता अभियान कार्यक्रम खडसंगी ग्रामपंचायत माध्यमातुन आपले गाव स्वच्छ व सुंदर गाव राबविण्यात आला. या कार्यक्रमामध्ये चिमूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी नितीन फुलझेले यांनी चक्क हातात झाडू घेउन सहकार्याच्या माध्यमातून खडसंगी परिसर व चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्ग तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसर स्वच्छ केले.
. शासन वेगवेगळ्या विविध योजना ग्रामीण व शहरी भागात राबवित असतात. त्याची जनजागृती ग्रामीण भागांतील नागरीकापर्यंत पोहचली पाहिजे हा उद्देश असून, यासाठी शासनाच्या अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम राबविले पाहिजे. असा शासनाचा मनसुबा आहे. त्यामुळं प्रत्येक गावात आज महास्वच्छ्ता अभियान गावोगावी राबविण्यात आला आहे.
. सदर महास्वच्छ्ता अभियान कार्यक्रमाला खडसंगी येथील सरपंच प्रियंका कोलते, ग्रामपंचायत अधिकारी आकाश कवाडे, शामकुळे विस्तार अधिकारी, अजय काकडे नरेगा, घोडगे, पुंडलिक धूर्वे, उपसरपंच संदीप भोस्कर, ग्रामपंचायत सदस्य रुपचंद शस्त्रकार, भाग्यश्री क्षिरसागर, ग्रामदर्शन विद्यालय तथा महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव मेश्राम, प्राध्यापक सातपुते, बोरकर, तसेच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


