Home सामाजिक  सरपंच महोत्सवात चिमुर तालुका अव्वल 

 सरपंच महोत्सवात चिमुर तालुका अव्वल

1112

नेरी : वरोरा शहरात तीन दिवशीय चंद्रपूर जिल्हा सरपंच महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवा दरम्यान क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात सांस्कृतिक कार्यक्रमात सामुहिक नृत्य स्पर्धेत चिमुर तालुका प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असुन ३१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह- सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.

.     वैयक्तिक नृत्य स्पर्धेमध्ये खुटाळा ग्रामपंचायतीच्या सदस्या माधुरी विनोद बारसागडे ह्या द्वितीय क्रमांक पटकावला असुन २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह- सन्मानचिन्ह चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.  समारोप कार्यक्रमात  चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या स्वागतासाठी आयोजक मंडळानी चिमुर तालुका महीलांना वेशभूषा परिधान करून आमंत्रित केले. चिमुर तालुका सामुहिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग माधुरी विनोद बारसागडे सदस्या ग्रा.पं.खुटाळा, काजल नत्थु नन्नावरे सरपंच ग्रा.पं. खांबाडा, प्रियंका शिगाल पाटील सरपंच ग्रा.पं.उसेगाव,अन्नपुर्णा ह. मांदाडे सरपंच ग्रा.पं. वडसी व दिपिका गुरुनुले सरपंच ग्रा.पं.केवाडा यांनी घेतला होता. यांच्या विजयासाठी नथ्थु नन्नावरे व विनोद बारसागडे उपसरपंच ग्रा.पं.खुटाळा यांचा मोलाचा वाटा आहे.

.     कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक समिती अध्यक्ष गणेश चवले, कोषाध्यक्ष राजेंद्र चिकटे, प्रफुल आसुटकर, प्रदिप महाकुलकर, नर्मदा बोरेकर, शुभांगी दातारकर, ॲड. देवा पाचभाई, नितिन खंगार, प्रतिभा मांडवकर व वरोरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी खुप परिश्रम घेतले. सदर चंद्रपूर जिल्हा सरपंच महोत्सव वरोरा येथे पार पडलेल्या विजेता चमुचे राजेंद्र कराळे सरपंच मानेमोहाळी, मंगेश धाडसे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चिमुर, शोभा कोयचाडे सरपंच कोलारा, विकास धारणे सरपंच मासळ, आकाश भेंडारे सरपंच पिपर्डा, संकेत सोनवाने सरपंच म्हसली यांचेकडुन अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!