Home सामाजिक विद्यार्थ्यांनो कठीण परिश्रमानेच यशाचा राजमार्ग निर्माण होतो – स्नेहल लाड

विद्यार्थ्यांनो कठीण परिश्रमानेच यशाचा राजमार्ग निर्माण होतो – स्नेहल लाड

1142

 नागभीड : कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड येथे संपन्न झालेल्या गुणवंत गौरव तथा निरोप समारंभात विद्यार्थ्यांनो कठीण परिश्रमानेच यशाचा राजमार्ग निर्माण होतो असे प्रतिपादन नागभीड पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी स्नेहल लाड यांनी केले.

.      शालांत प्रमाणपत्र परीक्षेला सामोरे जाणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यमान विद्यार्थ्यांना मागील सत्र शालांत परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा मिळून त्यांच्यात ऊर्जा निर्माण व्हावी हा उद्देश ठेवत सत्र 23-24 च्या वर्ग 10 वी व 12 वी कला, विज्ञान शाखेतील शालांत परीक्षेत गुणवंत ठरलेल्या व पुढील महिन्यात शालांत परीक्षेला समोर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी गोंडवन विकास संस्थेचे सचिव रवींद्र जनवार  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

.     याप्रसंगी पंचायत समिती नागभीड च्या संवर्ग विकास अधिकारी स्नेहल लाड प्रमुख मार्गदर्शिका तथा बक्षीस वितरक म्हणून तर संस्था संचालिका वर्षा जनवार, विद्यालयाचे प्राचार्य देवीदास चिलबुले व कार्यशाळा प्रमुख युवराज इडपाचे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

error: Content is protected !!