नेरी : येथील लोक कनिष्ठ महाविद्यालमध्ये दि 31 जानेवारीला अकरावीच्या विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन करून निरोप दिला.
. काही दिवसामध्ये बारावीची परीक्षा सुरू होणार असून ही परीक्षा झाली की सर्व विद्यार्थी शाळा सोडून निघून जाणार आहेत. त्यांना बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश प्राप्त करावा जीवनात सफल व्हावे व शाळेचे नाव लौकिक करावे तसेच परिक्षे संबंधी मार्गदर्शन मिळावा यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना विधिवत निरोप समारंभाचे आयोजन करून निरोप देण्यात आला. सदर कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन तो परीक्षेत यश प्राप्त करेल यासाठी त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीच्या सुयश प्राप्त करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
. या निरोप समारंभाला मार्गदर्शन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्ष म्हणून आर के. राऊत उपाध्यक्ष युग प्रवर्तक सेवा मंडळ नेरी, प्रमुख अतिथी वर्षा मो वासेकर संचालिका, नानाजी पिसे, किरण आष्टनकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून वि . डो.आष्टनकर, घनश्याम स.पीसे, ईश्वर का. रदंये, प्रा. दुर्वास ई. हटवार, मोरेश्वर वासेकर उपस्थित होते.
. या कार्यक्रमाचे संचालन दिक्षा ननावरे, प्रस्ताविक प्रा. संगीता ढोले यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा ज्योती पिसे यांनी मानले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


