चंद्रपुर : क्रिडा गुणांणमुळे शारिरिक विकासाचे योग्य संतुलन राहत असुन त्यामुळे योग्य रित्या शैक्षणिक विकास साधु शकत असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी हिरालाल लोया विद्यालय, वरोरा येथिल क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रंसगी आपले मत व्यक्त केले. वरोरा येथिल हिरालाल लोया विद्यालयात क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते. या उद्घाटन प्रंसगी बोलतानां खासदार धानोरकर यांनी म्हटले कि, प्रत्येक शाळा व महाविद्यालयात कला व क्रिडा स्पर्धा होणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्याच्या कला व गुणांना वाव मिळत असतो. आजच्या मोबाईलच्या युगात विद्यार्थ्याच्या गुणांना वाव मिळणे गरजेचे आहे. या विद्यार्थ्या मधुन उद्याचे कला किंवा क्रिडा क्षेत्रात खेळाडु किंवा कलाकार मिळत असतात असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
. यावेळी मंचावर आमदार सुधाकर अडबाले, तहसिलदार वरोरा योगेश कउटकर, निरजबाबू गोठी, कृष्णकांत लोया, रामबाबु लोया, श्यामबाबु लोया, डोंगरे, आंबटकर, आसुटकर व इतर मान्यवर, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


