Home सामाजिक आज भद्रावतीत भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम

आज भद्रावतीत भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम

1226

भद्रावती : भीमा कोरेगाव शौर्य दिन समिती भद्रावतीच्या वतीने आज दिनांक 1 जानेवारी 2025 ला स्थानिक जुने बस स्थानकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमा कोरेगाव शौर्य दिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

.      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुनराकृती पुतळ्याला सकाळी 9 वाजता माल्यार्पण, समता सैनिक दलतर्फे भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाला मानवंदना तथा  सलामी, बुद्ध वंदना घेण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता गोंदिया प्रस्तुत भीम गीत गायनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर वणी आणी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक रमेश राजूरकर राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद चंद्रपूरचे डेप्युटी सीईओ गिरीश धायगुडे, भद्रावती गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट मनीषा पथाडे, फेरी लँड स्कूलच्या संस्थापक वर्षा धानोरकर आदींची उपस्थिती राहणार आहे.

.      उपरोक्त कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आव्हान आयोजक समितीचे अध्यक्ष धर्माजी गायकवाड, सचिव उमेश रामटेके, कोषाध्यक्ष प्यारेलाल देवगडे आदींनी केले आहे.

error: Content is protected !!