महास्थविर पुज्य भदंत शिलानंद, भदंत ज्ञानज्योती यांच्यासह भिख्खू संघ राहणार उपस्थित
राष्ट्रीय प्रबोधनकार विकास राजा यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम.
नेरी : चिमुर तालुक्यातील नेरी जवळील शिवणपायली मिलिंद बुद्ध विहार नागसेन वन धम्मभुमी बहुउद्देशीय स्मारक मंडळ शिवणपायलीच्या वतीने दिनांक २ व ३ फेब्रुवारीला दोन दिवसीय धम्म मेळावा, नागसेन वन धम्मभुमी येथे आयोजित करण्यात आला आहे, त्यात धम्म रॅली, ध्वजारोहन, बुद्धवदंना, धम्म क्रांतीचे पाच सुत्रे, बाबासाहेबांना अपेक्षित समाज निर्मिती, या विषयाला अनुसरून मार्गदर्शन व मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ दिलीप पाटील अलिबाग, उद्घाटक लोकेश गजभिये नागपूर, विनोद खोब्रागडे वरोरा, प्रा. संजय बोधे वरोरा, प्रज्ञा राजुरवाडे समतादूत बार्टी पुणे, प्रभाकर पिसे चिमूर, चिमूरचे उपविभागीय अधिकारी व प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रीधर राजमाने, दी के निखूरे नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक संतोष बाकल, विजय डबरे, एकनाथ गोंगले, समाजसेवक किशोर अंबादे, लोकमत प्रतिनिधी विकास खोब्रागडे, सरपंच राजू भानारकर, पोलिस पाटील महेंद्र डेकाटे, ग्रामसेवक लोकचंद्र भसारकर, यांची उपस्थिति राहणार आहे. रात्रौला विकास राजा, यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.
. ३ फेब्रुवारी ला महास्थविर पुज्य भदंत शिलानंद,महास्थविर पुज्य भदंत ज्ञानज्योती व पुज्य भिख्खू संघ यांच्या द्वारे शिलग्रहणाबाबत धम्म वाणी प्रसारीत करणार आहेत. पुज्य भदंत धम्मचेत्ती संघारामगिरी, ता.वरोरा, जि.चंद्रपूर,
भदंत सोण (सोणी टेकडी वडसा), भिख्खू सोनुत्तर, भिख्खू धम्मवंश, भिख्खूनी इंदमुनी (उरवेला मेडिटेशन सेंटर बुद्धगया.) हे असणार आहेत. सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्तच्या दोन दिवसीय बौध्द धम्म परिषद व बौद्ध धम्म समारंभाची सांगता होणार आहे.


