माजी नगरसेवक रुपेश गायकवाड यांचा पुढाकार
नागभीड : नवखळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील कुपनलिका बंद पडल्याने विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती मात्र नागभीड नगर परिषद चे माजी नगरसेवक रुपेश गायकवाड यांनी पुढाकार घेत पाण्याची समस्या सोडवली.
. नागभीड नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या नवखळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी बोअर बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली. ही समस्या लक्षात घेता शाळेचे मुखाध्यापक रत्नपारखी, सहा.शिक्षक मांढरे, तुपकर यांनी ही समस्या माजी नगरसेवक रुपेश गायकवाड यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा रुपेश गायकवाड यांनी पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. व शाळेच्या जवळ असलेल्या मानिका देवी समाज सभागृहात असलेल्या बोअर मधून पाणी देण्याचे सकारात्मक पाऊल उचलत या ठिकाणी असलेल्या बोअर च्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले व पाण्याची समस्या सोडवली तसेच नवखळा येथील अरुण गायकवाड यांनी शाळेतील पाण्याची टाकी उतरवून त्यात नळ व पाईप फिटिंग करून देण्यात सहकार्य केले. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीकृष्णा देव्हारे यांनी विद्यार्थ्यांना खाली बसण्यासाठी ग्रीन मॅट ची भेट दिली.


