Home सामाजिक चिमूर आगाराला तीन दिवसात 74 हजार रुपयांचा नफा

चिमूर आगाराला तीन दिवसात 74 हजार रुपयांचा नफा

1136

गुंफा गोंदेडा यात्रेसाठी 5 बसेसच्या 48 फेऱ्या

नेरी : चिमूर तालुक्यातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमितील गुंफा गोंदेडा यात्रा दि 9 ते 13 जानेवारी पर्यंत मोठया उत्साहात पार पडली. या यात्रेला वंदनीय राष्ट्रसंताचे दर्शन घेण्यासाठी व तपोभूमीला अभिवादन करण्यासाठी हजारो गुरुदेव भक्त भाविकांनी भेट दिली. यासाठी चिमूर बस आगारांनी 5 बसेस ची व्यवस्था केली होती. दि 12, 13, 14 जाने ला बसफेऱ्या तीन दिवस सुरू होत्या. सकाळी 7 ते रात्रो 9 वाजेपर्यंत फेऱ्या सुरू होत्या. या संपुर्ण यात्रेच्या कालावधीत 48 फेऱ्या मारण्यात येऊन 1008 किलोमीटर चा प्रवासाचा टप्पा पूर्ण करीत आगाराला चौऱ्यातर हजार नऊशे पंधरा रुपयांचा उत्पन्न मिळाले तर 2876 यात्रेकरूंनी बस चा लाभ घेत यात्रा महोत्सवाला भेट देत राष्ट्रसंताना अभिवादन केले.

.      गुरुदेव भक्त भाविक व प्रवाश्यानी जादा वाहनांची बसेची सुविधा घेऊन चिमूर ते गोंदेडा यात्रेत सहभाग घेतला. गोंदेडा येथे बसस्थानकासाठी पेंडाल टाकण्यात आला होता. यासाठी गुंफा समितीचे सदस्य पांडुरंग अडसोळे मोटेगाव यांनी मोलाचे योगदान दिले. या यात्रेच्या उत्पादन च्या यशाकरिता आगार व्यवस्थापक रोशन मेहर यानी नियोजन केले तसेच आगारातील सूरज मुन वाहक निरीक्षक वैभव धाडसे, ,सहनिरीक्षक पुल्लूरवार ,वाहतूक निरीक्षक रिधेश्वर धांडे, होमराज सिडाम वरिष्ठ लिपिक, सुधीर भिलकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले तसेच सर्व चालक वाहक यांनी सुद्धा यात्रा सुयश करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले तसेच गुरुदेवभक्त पांडुरंग रामजी अडसोडे हे दरवर्षी चिमूर आगाराला यात्रेत मदत करून व्यवस्था करतात त्यामुळे त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!