भद्रावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटर (बाईक) टाकळी, भद्रावती व लोकजागृती संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व गीत गायन स्पर्धा बुधवार दि. 22 जानेवारी ला सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
. वक्तृत्व स्पर्धेचा विषय इंटरनेट व सोशल मीडियायाचा शिक्षणावर होणारा परिणाम असून ही स्पर्धा 12 ते 30 वयोगटासाठी आहे. ही स्पर्धा निशुल्क असून यामध्ये पहिले पारितोषिक 2 हजार रुपये, दुसरे पारितोषिक 1 हजार 500 रुपये व तिसरे पारितोषिक 1 हजार रुपये असून उत्तेजनार्थ पारितोषिक देखील आहे.
. वक्तृत्व स्पर्धा सकाळी 11 ते 2 या कालावधीत होणार असून गीत गायन स्पर्धेची वेळ दुपारी 2 ते 4 आहे. गीत गायान स्पर्धेमध्ये 12 ते 40 वर्षापर्यंत कोणीही भाग घेऊ शकतात. दोन्हीही स्पर्धांमध्ये कुठलीही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच सायंकाळी या दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण लेखक, दिग्दर्शक, महाराष्ट्राचे लाडके कलावंत अनिरुद्ध वनकर यांच्या हस्ते होणार असून जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी व इच्छुकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन लोक जागृती संस्थेतर्फे करण्यात आलेले आहे.