Home सामाजिक रासेयोच्या स्वयंसेवकांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

रासेयोच्या स्वयंसेवकांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

1175

सहभागी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कराने केले मंत्रमुग्ध

रासेयोच्या शिबिराच्या समारोप प्रसंगी सादरीकरण

बल्लारपूर : आपल्या खंडप्राय देशात विविध संस्कृतीचा समावेश आहे. ही संस्कृती सर्वत्र रुजली आहे. यामध्ये गोंडी संस्कृतीचे महत्व विशेष आहे.छत्तीशगडी लोकनृत्य याचा एक भाग आहे. याचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून मंत्रमुग्ध केले. शिबिराच्या समारोप कार्यक्रम दरम्यान रासेयोच्या स्वयंसेवकांनी नृत्याविष्कार करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

.      चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शिबिराचा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी सहभागी रासेयोच्या स्वयंसेवकांनी नृत्याविष्कार करून मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.’ डिजिटल साक्षरतेसाठी भारतीय युवाशक्ती ‘ या विषयावरील सात दिवसाच्या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रकाश शेंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजयसिंग, राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप जयस्वाल, प्रा. शालिनी जयस्वाल, विसापूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रा.पं.सदस्य शारदा डाहुले, सरदार पटेल महाविद्यालयाचे रासेयोचे विभागीय समन्वयक डॉ. कुलदीप गौंड, डॉ. वंदना खनके, डॉ. राजकुमार बिरादार, डॉ. पुरूषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख यांची उपस्थिती होती.

.       यावेळी डॉ. प्रकाश शेंडे म्हणाले, रासेयोचे शिबीर विद्यार्थ्यांच्या जीवनात जडणघडणीत महत्त्वाचे आहे. प्रगतीला चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. सामाजिक जाणिवेतून कार्य करण्याची संधी देणारे आहे.शारिरीक व मानसिक आरोग्य प्रदान करून सक्षमपणे घडविण्याची संधी मिळते. याचा अनुभव जीवनात आनंद देणारा आहे, असे त्यांनी सांगितले.दरम्यान रासेयोच्या ध्वजाचे ध्वजातरण करून शिबीराचा समारोप करण्यात आले. अहवाल डॉ. कुलदीप गौंड यांनी सादर केला. संचालन डॉ. पुरूषोत्तम माहोरे यांनी केले,आभार प्रदर्शन डॉ. वंदना खनके यांनी केले.

error: Content is protected !!