सामुदायिक प्रार्थना, ध्यान, रामधुन उपक्रम राबविणाऱ्या उपासकांचा सत्कार
भद्रावती : श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अधर्यू सेवाव्रती स्वर्गीय जगन्नाथ गावंडे यांचा पाचव्या स्मृति दिनानिमित्त ह. भ. प. लक्ष्मणदास काळे महाराज गुरुकुंज आश्रम मोझरी यांच्या राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक १९ जानेवारी रोज रविवारला सायंकाळी ७ वाजता हनुमान मंदिर देवस्थान सुरक्षा नगर येथील भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
. दिनांक १९ जानेवारीला रोजी सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सायं. ठीक ७ वाजता रामधुन, सामुदायिक ध्यान, प्रार्थना उपक्रम राबविणाऱ्या उपासकांचा सत्कार समारोह कार्यक्रम होईल. त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन व रात्रो ठीक ८ वाजता लक्ष्मणदास काळे महाराज यांचा राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल. दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ५.३० वाजता सामुदायिक ध्यान त्यानंतर सेवाव्रत्ती स्वर्गीय जगन्नाथ गावंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप होईल. या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकां तर्फे करण्यात आले आहे.


