बल्लारपूर : आजचे युग स्पर्धेचे आहे. या स्पर्धेच्या युगात ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या आहे. कोणतेही क्षेत्र याला अपवाद नाही. कला व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना मानसिक तयारी ठाम करा. आपल्यातील कलाविष्कार सादर करताना आत्मविश्वासाने सामोरे जायाच आत्मविश्वासाच्या बळावर नेतृत्वाची संधी मिळवा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गुरूदास बल्की यांनी विसापूर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
. चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर घेण्यात आले. ‘ डिजिटल साक्षरतेसाठी भारतीय युवाशक्ती ‘ या विषयावर आयोजित शिबीर दरम्यान बौद्धिक सत्रात ते बोलत होते.
. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. कुलदीप गौंड होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गुरूदास बल्की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. उषा खंडाळे, डॉ. वंदना खनके, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, डॉ. राजकुमार बिरादार, डॉ. पुरूषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख यांची उपस्थिती होती.
. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बल्की म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना शिबीर सामाजिक बांधिलकीची जाणिव करून देत आहे. स्वयंसेवकांचा व्यक्तीमत्व विकास घडविण्याची संधी देणारे आहे. यामुळे राज्य पातळीपासून राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याचा संकल्प केला पाहिजे. त्याची पूर्वतयारी विशेष शिबिराच्या माध्यमातून केली जाते. म्हणून शिबिरार्थांनी याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.


