Home सामाजिक वरोरा येथे स्व. निळकंठराव शिंदे यांचे चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा

वरोरा येथे स्व. निळकंठराव शिंदे यांचे चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा

1170

वरोरा : कै. निळकंठराव शिंदे प्रशा. सेवा महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दि. 14 जानेवारी रोजी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक तथा माजी आमदार स्व. निळकंठराव शिंदे यांचे चतुर्थ पुण्यस्मरण कार्यक्रम सकाळी ८:३० ला करण्यात आले.

.     त्या दरम्यान सकाळी महाविद्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मौन पाळण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य अजय रामटेके यांनी त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली आणि त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. कार्यक्रमास उपस्थित प्राध्यापक पियुष लांडगे यांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला उपस्थित प्राध्यापक प्रमोद पाठक, प्राध्यापिका सीमा बोभाटे, प्राध्यापिका प्रणाली नरड, प्राध्यापिका प्रीती पोहाणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी इंदिरा निखाडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!