बल्लारपूर आयटीआय मध्ये राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम
बल्लारपूर : स्वामी विवेकानंद यांनी समाजात इतिहासातील जखमा अवगत केल्या.ज्या दिवशी प्रत्येक माणसाचा धर्म स्वतंत्र होणार, तो दिवस मानवाच्या इतिहासातील सुवर्ण असेल. स्वप्नाळू आदर्शवादी विचार धोकादायक ठरतो.आपणास नवी शक्ती निर्माण करावी लागेल. मानवी ऐक्याचा विश्वधर्म स्वामी विवेकानंद यांनी सांगितला,असे प्रतिपादन विसापूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी बल्लारपूर आयटीआय मध्ये राष्ट्रीय युवा दिन निमित्त कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून केले.
. बल्लारपूर येथील राणी हिराई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन, उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयटीआयचे गट निर्देशक व्ही. यु. लेडांगे होते. उद्घघाटक म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, तर प्रमुख अतिथी माजी सैनिक एकनाथ गेडेकर, सामाजिक कार्यकर्ते नामदेव शेडमाके, माजी सैनिक सलाम पठाण, कविता गेडेकर, रत्नाकर खोब्रागडे यांची उपस्थिती होती.
. स्वामी विवेकानंद व जिजाऊ मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घघाटन अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान माजी सैनिक एकनाथ गेडेकर व सलाम पठाण यांनी आपल्या सैनिकी कार्याची माहिती विशद केली.दरम्यान आयटीआय मध्ये प्रशिक्षण घेऊन वेकोलित प्रशिणार्थी म्हणून रूजू होणारे आशिष कापसे,सय्यद युनूस, करण टिपले, मनिष राऊत यांचा स्मृतिचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे आयटीआय मध्ये आयोजित विविध स्पर्धेतील विजेते साक्षी बोदेले,अभिषेक उमरे, साक्षी खोब्रागडे, कोनिका जवादे,साहिल कोडापे, सुदीप मेश्राम यांच्यासह अन्य प्रशिक्षणार्थांचा प्रमाणपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रवि काळे यांनी केले. आभार प्रदर्शन आर .पी. ढोक यांनी केले. यावेळी आर. एम. खोब्रागडे, अमोल पाटील, बी. एस. दगडे, मनिष माहुरपवार, विजय इटनकर, सविता इटनकर यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


