प्राचार्य प्रशांत दोंतुलवार यांचे प्रतिपादन
चिंतामणी विद्यालयाचा वार्षिकोत्सव समारंभ
बल्लारपूर : विद्यार्थ्यांसाठी आजघडीला नवनवे दालन खुले झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. मात्र,याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास व जिद्द ठेवा. प्रयत्नामुळे यशाला गवसणी घालता येते. शालेय अभ्यासक्रम सोबत, इतर उपक्रमात देखील नैपुण्य दाखविण्याची संधी सांस्कृतिक मंचावरून करता येते. यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची मानसिकता शालेय जीवनापासूनच बाळगावी, असे प्रतिपादन चिंतामणी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत दोंतुलवार यांनी केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील चिंतामणी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुरुवारी वार्षिकोत्सव अंतर्गत स्नेह संमेलन पार पडले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उदघाटन सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी प्राचार्य प्रशांत दोंतुलवार होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते संदीप पोडे, राजू लांडगे, शाळा शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष देविदास तुंगीडवार, सदस्य वसुधा शेंडे, शिवा बांगडे यांची उपस्थिती होती.
. उदघाटन समारंभानंतर शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्ती, लावणी नृत्य, चित्रपट गीत, भारूडातून नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक अरूण टोंगे यांनी केले. संचालन साक्षी वडस्कर यांनी केले, आभार श्रद्धा साखरकर यांनी मानले.


