प्रतिभा धानोरकर यांची सूचना
अधिकाऱ्यांसोबत चार खाणींची पाहणी
चंद्रपूर : वेकोलीच्या वणी क्षेत्र अंतर्गत निलजई, बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी- पवनी येथील बुद्ध व पवनीतील हर्षा कंपनीच्या कोळसा खाण व्यवस्थापनांनी आधी स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य द्यावे. कामगारांची सुरक्षा व कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या. ३१ डिसेंबरला त्यांनी या चार खाणींना आकस्मिक भेट घेऊन पाहणी केली.
. कोळसा खाणींमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची सुरक्षा, कल्याणकारी सुविधा, एच. पी. सी. वेतनासंदर्भात वेकोली तसेच कंत्राटदारांशी चर्चा केली. वेकोली खाणीमुळे प्रभावित होणाऱ्या क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार देण्याच्या सूचना केल्या. कर्मचाऱ्याच्या सुरक्षेसंबंधी सूचना दिल्या व खाणीतील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. खाणींमुळे प्रभावित होणाऱ्या क्षेत्रातील नुकसानीचा आढावादेखील खा. प्रतिभा धानोरकर यांनी घेतला. यावेळी वेकोली अधिकारी, कंत्राटदार व खाण प्रभावित गावांतील नागरिक उपस्थित होते.


