वरोरा : ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत बोर्डा येथील ज्ञानदा वसतिगृहाच्या प्रांगणात ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वीणा लोणबळे तर उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा. उपलेंचवार तसेच प्रमुख पाहुणे राम टोंगे (ग्रंथपाल) हे उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ग्रंथ प्रदर्शनीला उत्स्फर्तपणे प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुशिल शेंदरे (सहा. ग्रंथपाल) यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास ग्रंथालयातील कर्मचारी सुरेश कांबळे, महादेव डाहुले यांनी अथक परिश्रम घेतले.


