Home सामाजिक तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत येनोली शाळा पाचव्यांदा अव्वल

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत येनोली शाळा पाचव्यांदा अव्वल

1204

सिद्धी मडावी व खुशी बोरकर प्रथम

नागभीड : तालुक्यातील धर्मराज कन्या विद्यालय, नवेगाव पांडव येथे दिनांक ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनीमध्ये आदिवासी गट, गैर आदिवासी गट व दिव्यांग गट अश्या गटांमध्ये विद्यार्थ्यांनी विषयनिहाय प्रतिकृतींची मांडणी केलेली होती.

.      येनोली माल येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी .सिद्धी नरेश मडावी (इयत्ता 6 वी) व . खुशी कवडू बोरकर (इयत्ता 7 वी) यांनी आदिवासी उच्च प्राथमिक गटातून प्रदर्शनीय प्रतिकृतीचे उत्कृष्ठरित्या मांडणी आणि सादरीकरण करून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले.

.     विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येनोली माल शाळेने सलग पाचव्यांदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक पटकावले असून शाळेची व गावाची यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थीनींनी मिळविलेल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कोयताडे, मार्गदर्शक विज्ञान शिक्षक सुशांत कंदीकुरवार तसेच शाळेतील शिक्षक वृंद व शाळा व्यावस्थापन समिती यांना दिले आहे.

error: Content is protected !!