Home सामाजिक नंदोरीत आज सर्व रोग निदान व उपचार शिबीर

नंदोरीत आज सर्व रोग निदान व उपचार शिबीर

1215

श्रद्धेय बाबा आमटे यांच्या जयंती निमित्त शिबीराचे आयोजन

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपुर व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांचा संयुक्त उपक्रम

भद्रावती : स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपुरच्या वतीने श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान अंतर्गत आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान व उपचार शिबीर गुरुवार दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद शाळा नंदोरी येथे आयोजन करण्यात आला आहे.

.      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपुर चे संस्थापक रविंद्र शिंदे उपस्थित राहणार आहे. उद्घाटक म्हणून उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल खुजे राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून  ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, उपसरपंच उषा लांबट, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपुर च्या कोषाध्यक्ष सुषमा शिंदे, पंचायत समिती भद्रावतीचे माजी सभापती धनराज विरुटकर, कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा चे उपसभापती जयंत टेमुर्डे, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती च्या उपसभापती अश्लेषा मंगेश भोयर, ग्राम पंचायत भटाळी चे सरपंच सुधाकर रोहणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपुर चे प्राध्यापक डॉ. सचिन दगडी, चांडक हॉस्पिटल  वरोरा चे डॉ. विजय चांडक, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष घनश्याम ढवस, दैनिक नवजीवन चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, माजी उपसरपंच भानुदास ढवस, माजी ग्राम पंचायत सदस्य विनोद लांबट, सामाजिक कार्यकर्ते मनोज दानव, माजी तंटामुक्त अध्यक्ष रमेश तिखट उपस्थित राहणार आहे.

.     या सर्व रोग निदान व उपचार शिबीराला परिसरील सर्व ग्रामस्थ, नागरिक तसेच शेतकरी बंधु भगिनींनी शिबिराचा लाभ घ्यावा व आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपुर चे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कार्यवाहक प्रशांत कारेकर, वैभव डहाणे, प्रमोद वाघ, कल्पना टोंगे यांनी केले आहे.

error: Content is protected !!