रांगोळी स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेरी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन कर्मभूमीत दि 12 डिसें पासून वंदनीय महाराजांच्या 56 व्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरवात झाली असुन अनेक विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने पुण्यतिथी महोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. सदर कार्यक्रमात भव्य अश्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
. या स्पर्धेत अनेक महिलांनी भाग घेतला आणि आपआपली कला रांगोळीच्या माध्यमातून सादर केली. यात काही महिलांनी आकर्षक रंग रंगोटी करून महाराजांची प्रतिमा साकारली आणि वंदनीय महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला रंग आणला. रांगोळी स्पर्धेत एकवीस महिलांनी सहभाग घेऊन रांगोळीच्या रंगाने स्वतःची कला कसूर दाखवीत या महोत्सवाला रंग देण्याचा प्रयत्न केला. जीवनात रंगाचे अनेक महत्वपूर्ण कार्य आहे हेच रंग रांगोळीच्या माध्यमातून महिलांनी साकारत समाजाला महत्वपूर्ण संदेश दिला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते संपूर्ण गुरुदेव भक्त भाविक उपस्थित होते परीक्षकांनी सर्वांच्या कलाकृती पाहून या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.


