Home सामाजिक मोफत आरोग्य शिबिरात 611 जणांची आरोग्य तपासणी

मोफत आरोग्य शिबिरात 611 जणांची आरोग्य तपासणी

1297

चिमूर : तालुक्यातील खरसंगी येथे पार पडलेल्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये एकूण 611 जणांनी आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आला.

.       या शिबिरा दरम्यान चिमूर भागातील बहुतांश महिला व पुरुषांना पाठीचे आजार व कंबर दुखी ने त्रस्त असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. ग्रामीण भागामध्ये विशेषतज्ञ डॉक्टर उपलब्ध राहत नाही व सोबतच लोक आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहत नाही परिणामी ते योग्य उपचारापासून वंचित राहतात. आरोग्य शिबिरामध्ये तपासणी केल्यानंतर ज्याना डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे त्यांचा पाठपुरावा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व मदत करण्याचे आश्वासन सुद्धा इनलाइटन मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन ऍड अनंता रामटेके यांनी केली. शिबिरामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथील तज्ञ डॉक्टर उपस्थित झाले होते.

.     शिबिराचे उद्घाटन डॉ. रणदिवे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून खडसंगी च्या सरपंच प्रियंका कोलते, शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैभव पाटील, गजानन चव्हाण, गौतम खोब्रागडे,रामकृष्ण गेडाम, विजय सोनुले, यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!