Home सामाजिक सिंदेवाहीत भैय्यासाहेब आंबेडकर यांची ११२ वी जयंती साजरी

सिंदेवाहीत भैय्यासाहेब आंबेडकर यांची ११२ वी जयंती साजरी

1284

सिंदेवाही : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव सुपुत्र भैय्यासाहेब म्हणजेच यशवंत भीमराव आंबेडकर यांचे १२ डिसेंबर जयंती दिनी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा सिंदेवाहीच्या वतीने स्थानिक सिद्धार्थ नगर येथील बुद्ध विहारात ११२ वी जयंती साजरी करण्यात आली.

.     भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रथम आणि एकमेव पुत्र यशवंत आंबेडकर हे भैय्यासाहेब या नावाने सर्वश्रुत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण नंतर भैय्यासाहेब यांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले. हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा खचून न जाता, न डगमगता आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी वाहिले. भारतीय बौद्ध महासभेची जबाबदारी खांद्यावर घेत चैत्यभूमी, दीक्षाभूमी निर्माण केली. १२ डिसेंबर १९१२ रोजी जन्मलेल्या भैय्यासाहेब आंबेडकर यांची ११२ वी जयंती नुकतीच भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व अंतर्गत तालुका शाखा सिन्देवाही यांचे वतीने सिध्दार्थ नगर बुद्ध विहार येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे हे होते. तर प्रमुख पाहुणे कोषाध्यक्ष भैय्याजी निमगडे, तालुकाध्यक्ष अंबादास कोसे, तालुका सरचिटणीस प्रा जगदीश सेमसकर, महिला तालुकाध्यक्ष शुभांगी खोब्रागडे , सरचिटणीस प्राजक्ता खोब्रागडे, शांताबाई पाझारे, कोषाध्यक्षा मिनाक्षी बारसागडे शहर संघटक अरविंद रामटेके, शहराध्यक्षा संगीता खोब्रागडे, उपाध्यक्षा शोभा खोब्रागडे, उपाध्यक्ष, दर्शना खोब्रागडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

.      कार्यक्रमांची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली असून उपस्थित मान्यवरांनी भैय्यासाहेबाच्या जिवणावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिनाक्षी बारसागडे यांनी केले तर सूत्रसंचालन अंबादास कोसे यांनी केले उपस्थितांचे आभार प्रा वनिता रामटेके यांनी मानले. यावेळी रीता पोपटे, मंदा भैसारे, नलिना रामटेके, सुजाता चाहदे, सुलोचना रामटेके, आकाश बागडे, अनिकेत खोब्रागडे, प्रतीक्षा मेश्राम, अनिता रामटेके, व बौद्ध उपासक उपाशिका तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, ग्राम पदाधिकारी वार्ड पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!