Home सामाजिक नंदोरीत जगन्नाथ महाराजांचा पालखी सोहळा

नंदोरीत जगन्नाथ महाराजांचा पालखी सोहळा

1302

विविध कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपुर : विदेही सदगुरू जगन्नाथ बाबा संस्थान नंदोरीच्या वतीने १६ डिसेंबरला नंदोरीत जगन्नाथ बाबा संस्थान पालखी सोहळा होणार असून १४, १५ व १६ डिसेंबर या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

.       या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ स्वामी पतसंस्था शाखा वरोराचे संचालक परिक्षित एकरे राहणार असून या कार्यक्रमाचे उद्धाटन शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख रविंद्र शिंदे, लघु उद्योजक वरोरा रमेश राजूरकर यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, नंदोरीचे सरपंच मंगेश उर्फ श्रीहरी भोयर, उपसरपंच उषा लांबट, ग्राम पंचायत नंदोरी चे माजी सरपंच शरद खामनकर, भटाळी चे सरपंच सुधाकर रोहनकर, दैनिक नवजीवनचे जिल्हा प्रतीनिधी रवी खाडे, ग्राम पंचायत सदस्य किशोर उमरे, मनोहर नायर, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती चे उपसभापती तथा म. ज्यो. फुले विद्यालय नंदोरी च्या सहा. शिक्षिका अश्लेषा भोयर (जीवतोडे),चंद्रकांत वासाडे, मुकेश जिवतोडे, ह.भ.प. खिरटकर महाराज, घनश्याम ढवस, किसन एकरे, तुळशीदास लांबट, देवीदास उमरे, माजी पोलिस पाटील अनिल ठेंगणे, धनराज विरूटकर, रामकृष्ण मोंढे, ग्राम पंचायत सदस्य किशोर उमरे, आशीतोष घाटे, अजित पुसनाके, भानूदास ढवस, विकास लांबट, जगदीश उमरे, विवेक एकरे, प्रभाकर मांडवकर, आनंदराव जिवतोडे, रमेश लांबट, गोपीनाथ बोबाटे, संतोष लांबट, प्रवीण लांबट, संजय पुनवटकर, दौलत एकरे, आनंदराव दानव, घनश्याम लांबट, आनंदराव उरकांडे, शामराव एकरे, शंकर लेडांगे, स्वप्नील लांबट, मनिष ठक, शामराव खापणे, सुनील उमरे, कळसकर, ह.भ.प. पांडुरंग लांबट, बंडू भोयर, सुरेंद्र एकरे, हरी एकरे, विठ्ठल अंड्रस्कर, उद्धव बलकी, राजु लांबट, सुखदेव आस्कर, विजय उइके, अमोल लांबट, शरद लांबट, विठ्ठल लांबट, सुनील कांबडे, अक्षय हरणे, राहुल भडगरे यांची उपस्थिती राहणार आहे.

.       शनिवारी सकाळी ६ वाजता परिसर स्वच्छता, ८.३० वाजता घटस्थापना, दुपारी १२ ते ३ भजन वक्रतुंड महिला भजन मंडळ नंदोरी बु, दुपारी ४ ते ६ अध्याय वाचन, सायंकाळी ६ ते ८ हरिपाठ, रात्री ९ ते १२ भजन श्री. साई भजन मंडळ नंदोरी बु, शुक्रवारी सकाळी ७ वाजता काकड आरती, १२ ते ३ भजन राम चरित्र मानस भजन मंडळ नंदोरी बु, रात्री ८ ते १० भजन प्रगती महिला भजन मंडळ नंदोरी बु, रात्री १० ते १२ भाजन गुरुदेव वारकरी भजन मंडळ नंदोरी बु तर शनिवारी सकाळी ८ ते ११ भजन हनुमान वारकरी भजन मंडळ नंदोरी बु, सकाळी ८ वाजता पालखी सोहळा, ११ ते २.३० वाजता ह.भ.प. प्राध्यापक चरडे महाराज चिमुर यांचे कीर्तन, रात्री ९ वाजता दहीहंडी व महाप्रसाद होणार आहे. यानंतर होणार्‍या पालखी सोहळ्यात नंदोरी परिसरातील विविध भजन मंडळे उपस्थित राहणार आहे. या तीन दिवशीय कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जगन्नाथबाबा देवस्थान कामेटी तथा समस्त ग्रामवासी नंदोरी च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!