Home सामाजिक खरवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

खरवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

1304

हेल्थयेज इंडिया जीएमआर चा उपक्रम

वरोरा : हेल्थयेज इंडिया जीएमआर वरोरा व अभिजित कुडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने खरवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला गावकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

.      ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यासाठी हेल्थयेज इंडिया जीएमआर वरोरा संस्थेच्या वतीने विविध प्रकारच्या शिबिराचे आयोजन सातत्याने सुरू आहे. गरजूंना मदत म्हणून सर्व प्रकाराचे तपासणी मोफत करून त्यांना औषधी मोफत दिले जाते. सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.  मोफत नेत्र तपासणी तसेच शस्त्रक्रिया शिबीर राबविल्या जाणार  आहे.  यावेळी ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

.      या शिबिराच्या यशश्वीतेसाठी रोशन भोयर, रामानंद वसाके, प्रफुल गीरटकर, उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे मनोज पाल, प्रणाली सोनटक्के, संदिप नरवडे, रशेदा शेख, वैभव देठे, संदिप काळे प्रयत्न केले.

error: Content is protected !!