रासायनिक खतामुळे जमीनीचा पोत घसरतो
भविष्यात हरितक्रांतीचे स्वप्न धुळी मिळण्याची शक्यता
विसापूर : आजघडीला शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. शेतातील उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते वापरली जात आहे. परिणामी शेत जमीनीचा पोत खालावत आहे. शेत जमीनीचे आरोग्य जपण्यासाठी माती परीक्षण महत्वाचे आहे. भविष्यातील हरितक्रांतीचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर उपाय म्हणून माती परीक्षण करून शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करावा. ही काळाची गरज आहे. असा सल्ला कृषी विभाग देत आहे.
. आपला भारत देश कृषी प्रधान आहे. शेती व्यवसायावर ग्रामीण अर्थ व्यवस्था अवलंबून आहे. मात्र, मायबाप सरकार शेतकऱ्यांचा मुलभूत समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांना शेत मालाला भाव मिळावा म्हणून झगडावे लागत आहे. यातच बळीराजा निसर्गाच्या दृष्टचक्रात भरडला जात आहे. त्याचा संघर्ष पाचवीलाच आहे. यातून मार्ग काढण्यासाठी व शेतातील उत्पन्न वाढीसाठी तो प्रयत्नरत आहे. यामुळे तो रासायनिक खते व किटकनाशक मोठ्या प्रमाणात वापरत आहे. परिणामी दिवसेदिवस शेत जमीनीचा पोत कमी होत आहे. यावर उपाययोजना आहे.
. मात्र, शेतकऱ्यांच्या पचनी पडत नाही. याविषयी कृषी विभाग चिंता व्यक्त करत आहे. शेतकऱ्यांनी शेतातील पीक घेण्यासाठी सेंद्रिय शेती करावी. शेणखत, हिरवळीचे खत आदींचा उपयोग करावा. पिकानुसार माती परीक्षण करून घ्यावे. यामुळे शेत जमीनीत कोणत्या घटक द्रव्यांची कमतरता आहे. याची माहिती शेतकऱ्यांना मिळू शकते. या प्रक्रियेत देखील शेतातील उत्पन्न वाढीसाठी मदत मिळते. शेत जमीन नापिक होण्यापासून वाचू शकते. भविष्यातील नष्ट होणारे हरितक्रांतीचे स्वप्न सांभाळून ठेवता येते. शेतकऱ्यांनी मात्र रासायनिक खते व भरमार किटकनाशक वापरण्यात कमतरता करावी, एवढीच माफक अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी माती परीक्षण कसे करावे शेतकऱ्यांनी शेत जमिनीतून योग्य प्रकारे मातीचा नमुना घ्यावा, यासाठी कृषी तज्ञांचा सल्ला घ्यावा. मातीच्या नमुन्याची तपासणी चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळेत करावी. माती परिक्षणाचा अहवाल शेतकऱ्यांना महिनाभरात प्राप्त होतो, त्यानुसार शेतकऱ्यांना शेत पिकांचे नियोजन करण्यात मदत मिळते. आपल्या जिल्हात ही व्यवस्था 15 दिवसात माती परीक्षण अहवाल मिळते, हे विशेष
‘शेतातील उत्पन्न कमी खर्चात जास्तीत जास्त घेण्यासाठी माती परीक्षण महत्वाचे आहे. खताचे प्रमाण ठरविण्यात उपयोगी पडते. शेत जमिनीत कोणते घटक द्रव्य कमी आहे. याची माहिती होते. यामुळे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करता येते. माती परीक्षणाचा अहवाल, पिकनिहाय कृषी विद्यापीठाकडे पाठविण्यास शिफारस केली जाते. श्रीधर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, बल्लारपूर