भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथे नेहरू युवा केंद्र चंद्रपूर (युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार) व श्री जगन्नाथ बाबा विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय वायगाव (तु) व बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट तथा शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच संविधान दिन निमित्त विविध स्पर्धा, जसे की सदर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन,पदयात्रा, काढण्यात आली.
. चित्रकला व निबंध स्पर्धेतील सहा विद्यार्थाना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आरती बालाजी घोडमारे,व दित्तीय क्रमांक सावरी अनिल आगलावे,आणि यांना प्राप्त झाला, व निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राजक्ता घनश्याम कुरेकार,व दित्तिय क्रमांक श्रेया बंडू गायकवाड, यांना प्राप्त झाला. विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.नेहरू युवा केंद्र चंद्रपूर चे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा माजी भद्रावती तालुका समन्वयक आशिष सुरेश हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
. स्पर्धेविषयी योग्य मार्गदर्शन श्री. जगन्नाथ बाबा विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय वायगाव (तु) चे मुख्याध्यापक नंदकिशोर धानोरकर व शिक्षक मंगेश बोढाले, अमृत ताजने, अविनाश टोंगे, अर्चना जाधव, रमेश करमनकर, खुशाल पाटिल, सुनील मोन्डे तसेच बार्टी चे समतादुत गणेश हनवते, बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे कोषाध्यक्ष निखिल चौखे, सदस्य कुणाल ढोक, शौर्य क्रिडा मंडळाचे सदस्य राहुल कोसुरकार, प्रविण भरडे, देवानंद पांढरे, पंकज दडमल शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होते.
. कार्यक्रमाचे संचालन मंगेश बोढाले यांनी केले तर प्रास्ताविक नंदकिशोर धानोरकर यांनी केले. आभार अमृत ताजने यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी शौर्य क्रिडा मंडळाचे सदस्य राहुल कोसुरकार, निखिल चौखे, कुणाल ढोक, प्रविण भरडे, अमोल महागकार, देवानंद पांढरे, पंकज दडमल आदिनी सहकार्य केले.


