Home सामाजिक तपोभूमी गुंफा गोंदेडा येथे यात्रा महोत्सव नियोजनाची आमसभा संपन्न

तपोभूमी गुंफा गोंदेडा येथे यात्रा महोत्सव नियोजनाची आमसभा संपन्न

1309

शेकडो गुरुदेव भक्तांची उपस्थिती

नेरी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी गोंदेडा गुंफा येथे रविवारी दि 24 नोव्हेंबर ला गुंफा यात्रा समितीचे अध्यक्ष मिथुन गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली संपुर्ण गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत गुंफा यात्रा महोत्सव नियोजनाची आमसभा संपन्न झाली.

.      विदर्भाची पंढरी समजली जाणारी चिमूर तालुक्यातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदेडा येथे गुंफा यात्रा महोत्सव समिती व गुंफा गोंदेडा समिती यांच्या पदाधिकारी व संपूर्ण गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत 13 जानेवारी २०२५ ला होणाऱ्या गुंफा यात्रा महोत्सवाच्या नियोजनाची आमसभा घेण्यात आली. या सभेत येणारी गुंफा यात्रेचे नियोजन कश्यापद्धतीने करता येईल व यात्रा महोत्सव चांगल्या प्रकारे कसा साजरा करता येईल यावर चर्चा करण्यात आली. तसेच होणाऱ्या सर्व खर्चावर आणि नियोजनावर चर्चा करून सर्व संमतीने नियोजन करण्यात आले मागील वर्षीच्या खर्चाचे तपशील वाचन करण्यात आले.

.       नवीन विषयावर चर्चा करण्यात आली आणि अध्यक्ष च्या परवानगीने अनेक विषयांवर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले. आणि यात्रा महोत्सवाच्या तयारीला लागण्याचे आव्हान करण्यात आले. यावेळी विठ्ठल सावरकर, मिथुन गुरनुले, चंद्रभान शेंडे, नथ्यू भोयर, छोटू राचलवार, भोजराज कामडी, पांडुरंग अडसोळे, गिरीश भोपे, महेश गिरडकर, रत्नमाला सोनूले, संभाजी वाढई, एकनाथ बोरकर, विनोद हटवादे, वामन बोरकर, प्रा नीलकंठ लोनबले, प्रदीप जेंगटे आणि समितीचे पदाधिकारी सदस्यगण शेकडो गुरुदेव भक्तगण उपस्थित होते.

error: Content is protected !!