Home सामाजिक विठाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे अनाथलयात बाल दिवस साजरा

विठाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे अनाथलयात बाल दिवस साजरा

1316

चंद्रपूर : संपूर्ण भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिवस म्हणून साजरी करण्यात येते. याचेच औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे विठाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे बाल दिवस अनाथलयातील मुलांसोबत साजरा करण्यात आले.

.      यात मुलांसाठी चित्रकले स्पर्धेसोबतच विविध खेळाचे आयोजन करण्यात आले . यात मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. चित्रकले स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक चे बक्षीस वितरित करण्यात आले. सोबतच सर्व मुलांकरिता शालेय वस्तू ,फराळ  आणि मिठाईचे वाटप करण्यात आले . याप्रसंगी स्नेहभोजनाचा आनंद सर्वांनी घेतला. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता.

.      यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर, सचिव चेतन जनबंधु, ओमप्रकाश मिसार, कमल अलोने, अल्का सोनकुसरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन कीर्ती नगराळे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश काहीलकर यांनी केले.

.      कार्यक्रमाच्या यशवी ते साठी किर्ती नगराळे, भारती जिराफे, सुषमा घाटे, मीनाक्षी अलोने, सीमा टेकाळे, वेदांती सूत्राळे, माधुरी काहीलकर, वैशाली बावणे, अर्चना मिसार, शालू कथडे, नेहा कथडे, अर्चना अलोने, आराध्या कथडे, अनुजा अलोने, दिनेश जुमडे, प्रेमराज गावंडे, आरुष अलोने, मिथिलेश काहीलकर इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

error: Content is protected !!