वरोरा शहरात अनेकांना रमीचे वेळ
शिक्षकाला तब्बल 70 लाखाचा चुना
रवी खाडे
चंद्रपुर : ऑनलाईन रमी खेळाचा नाद लहाना पासून तर मोठ्यांपर्यंत जोडलेला आहे. असाच नाद वरोरा तालुक्यातील एका युवकाला महागात पडला आहे. या खेळात महिण्याभरात एक लाख रुपये गमावल्याने तणावात येत त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर एका नामवंत विद्यालयाच्या शिक्षकाने सुद्धा 70 लाख रुपये हरल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वेळीच शेजाऱ्यांनी त्याचा जीव वाचवीला.
. ऑनलाइन गेमचा नाद अनेक लोकांना असल्याचे आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. अनेकजण या खेळात कर्जबाजारीही होत असतात. मात्र, तरीही अनेक तरूण अशा प्रकारच्या गेम खेळत असतात. ऑनलाईन गेममध्ये सध्या अनेक रमी खेळाच्या गेम सहज उपलब्ध होतात. तसेच या गेमच्या जाहिराती देखील मोठ्या प्रमाणावर दाखवल्या जातात. त्यामुळे झटपट पैसे कमवण्याच्या नादात अनेक तरूण या खेळाकडे आकर्षित होत आहेत. मात्र, या ऑनलाईन रमी गेमच्या नादात एकाने टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.
. वरोरा तालुक्यातील आसाळा येथील एक विवाहित तरुण ऑनलाईन रम्मी गेमच्या आहारी गेला. मागील तीन महिन्यापासून तो रम्मी खेळत होता. या गेम मध्ये सुरुवातीला तो जिंकत गेला. जिंकलेली रक्कम तो आपल्या बँक खात्यात विड्रॉल करायचा. 1 रुपयापासून रम्मी खेळण्याची त्याने सुरवात केली. अलगदपणे तो या रम्मीच्या आहारी गेला आणि त्याची 1 रुपयाची सुरवात 500 रुपयावर गेली. रम्मी खेळण्यासाठी त्याने अनेक नातेवाईकांना विविध कारण सांगून पैशाची मागणी केली. मिळालेले पैसे तो रम्मीत हारत गेला. एका महिन्यात त्याने चक्क 1 लाख 27 हजार रुपये हारला. त्याचे कर्ज वाढत गेले. त्यामुळे तो तणावाखाली आला होता. त्यामुळेच त्याने हे गळफास लावून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली.
ऑनलाईन गेममुळे अनेकांना आपले सर्वस्व गमवावे लागले आहे. अनेकजण या गेममुळे कर्जबाजारी झाल्याने रस्त्यावर आले आहेत. तर काहीजणांनी आपले जीवन संपवले आहे. मात्र, तरीही झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेकजण अशा गेम खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ऑनलाईन गेम खेळताना विचार करून खेळा असे आवाहन जाणकारांकडून करण्यात आले आहे.
शिक्षकाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न ऑनलाईन रम्मी खेळाचे व्यसन विद्यार्थ्यांपासून तर शिक्षकांपर्यंत अनेकांना लागले आहे. या रम्मी अँप मध्ये सुरुवातीला खेळण्यासाठी बोनस पैसे मिळतात. आणि खेळानुना मोहात पाडतात. एकदा त्यात अडकले की त्याचे व्यसन लागतात. असेच व्यसन वरोरा शहरातील एका नामवंत विद्यालयाच्या शिक्षकाला लागले. तो शिक्षक इतका आहारी गेला होता की त्यांनी तब्बल 60 ते 70 लाख रुपये यात हारले. शेवटी कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच शेजाऱ्याचे लक्ष गेल्याने त्याचा जीव वाचला. म्हणून ऑनलाईन गेम खेळा पण जरा जपून.