नागरिकांच्या कामबंद इशाऱ्या नंतर रपट्याच्या कामाला सुरुवात

16

सिंदेवाही : वासेरा – रामाळा सिंदेवाही मार्गावरील बोकडडोह नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने पुल तोडून वळण मार्गावर तयार केलेला रपटा वाहून गेल्याने मागील पाच महिन्या पासून मार्ग बंद झाला आहे. सदर मार्ग सुरू करून देण्यासाठी अनेक गावातील ग्राम पंचायत कडून निवेदन देण्यात आले. मात्र कंत्राटदाराने कानाडोळा केला. आणि पुलाचे काम सुरू केले. अखेर काही नागरिकांनी नदीवर जावून पुलाचे बांधकाम बंद करण्याचा इशारा दिला असल्याने तात्काळ रपट्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

.       सिंदेवाही पासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या रामाळा नदीवरील पूल क्षतिग्रस्त झाला असल्याने पुल तोडून त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत कंत्राटदार मार्फत नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र कंत्राटदाराने पावसाळ्यात पुलाचे काम सुरू केले असून वळण मार्गावरील रपटा वाहून गेला असल्याने मागील पाच महिन्यांपासून सिंदेवाहीला जोडणारा मार्ग बंद झाला असल्याने या परिसरातील १५ ते २० गावातील नागरिकांना फिरून येवून सिंदेवाही या ठिकाणी यावे लागत आहे. सदर नदीचे पाणी कमी झाले असले तरी मात्र रपटा सुरू करून देण्यास संबधित कंत्राटदार टाळाटाळ करीत असताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मुखरू बनसोड, गडबोरी येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव उज्वावकर, रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरज कोडापे, वासेरा ग्राम पंचायत चे सरपंच दिलीप मेश्राम, रामाळा ग्राम पंचायत चे सरपंच अरविंद मेश्राम, वासेरा येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजू नंदनवार, सदस्य महेंद्र कोवले, यांनी कामाचे ठिकाणी जावून काम बंद करण्याचा इशारा दिला असल्याने तात्काळ त्याच दिवशी रपट्याचे काम सुरू झाले आहे. उशिरा का होईना परंतु येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत रपटा तयार करून नेहमीचा मार्ग सुरू होणार असल्याची माहिती कंत्राटदाराचे सुपरवायझर यांनी माहिती दिली आहे.