जुन्या आठवणींना उजाळा देणारा स्तुत्य उपक्रम
शिक्षकांना ही आले भरून
माजरी : कर्मवीर विदयालय माजरी येथे सन 1999-2000 या 10 वी बॅच च्या वतीने माजी विद्यार्थी यांचा स्नेहमीलन सोहळा दि. 5 नोव्हेंबर रोज मंगळवार ला आयोजित करण्यात आला होता.
. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ग्रामीण शिक्षण व प्रसारक मंडळ वरोरा चे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे होते तर प्रमुख पाहुणे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा चे संचालक उत्तमराव झाडे, कर्मवीर विदयालय माजरी चे मुख्याध्यापक संतोष चौखे हे होते. सत्कार्मुर्ती म्हणून शिक्षक बुरान, पारखी, धवणे, गौरकार, ताजने, माहुरे, खेकारे, पिंपळशेडे सोबत इतर मान्यवर सुद्धा होते.
. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर स्वागतगीताने सर्वांचे स्वागत करण्यात आले. सर्व मान्यवर शिक्षकांचे शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपा चांदेकर हिने करताना संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.त्यानंतर सर्व शिक्षकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणीना उजाळा दिला यात सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनाही गदगदून आले.२४ वर्षानंतर झालेल्या भेटीने जुन्या आठवणीने सर्व शालेय जीवनात रममाण झाले. तर माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.. सरतेशेवटी फोटोसेशन करूनव स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन सर्वांनी एकमेकांना निरोप दिला. यादरम्यान स्नेहमिलणाच्या आठवणी म्हणून सन १९९९-२००० च्या बॅच कडून शाळेला अत्यावश्यक साहित्य भेटस्वरूपात देण्यात आले.
. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद, जमदाडे, मुकेश सिंगसार, संतोष दुधे, पंकज तीतरे, ज्ञानचंद गुळगुंडे, नितीन किरमाडे, योगिता बंड, दिपाली रामटेके सोबत सर्वांनीच सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज मेश्राम व पंकज ठमके यांनी केले तर आभार संतोष दुधे यांनी मानले.


