प्रदूषण मुक्त ग्रीन फटाक्यांचे आकर्षण
ग्राहकांच्या गर्दीने फुलला बाजार
विसापूर : दिवाळी सण मोठा, नाही उत्साहाला तोटा, असे दिवाळीचे वर्णन सर्वश्रुत आहे. अभ्यंगस्नान सुगंधी उटणे, अंगणात रांगोळी ची सजावट, पण त्यांची आरास आणि फटाक्यांची आतषबाजी हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्ये. हा आनंद द्विगुणित करण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील फटाका बाजार जिल्हा भरात प्रसिद्ध आहे. या बाजारातील प्रदूषण मुक्त ग्रीन फटाके ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. आजघडीला विसापुरातील फटाका मार्ट ग्राहकांच्या गर्दीने फुलला आहे. मात्र, येथील फटाका बाजाराला महागाई ची किणार देखील दिसून येत आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील फटाका बाजार पंचक्रोशीत नावाजला आहे. शिवाकाशी येथील फटाक्यांची मोठी बाजार पेठ आहे. यामुळे दिवाळी सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी जिल्हा भरातील व जिल्हा बाहेरील ग्राहकांच्या पसंतीला येथील फटाके विक्री केंद्र आहे. येथील फटाका बाजार मागील ५० वर्षापासून भरवला जाते. आठ ते दहा फटाके विक्रेते ग्राहकांना सेवा देत आहेत. उत्तम दर्जाचे व ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीच्या फटाक्यांमुळे हा बाजार ओळखला जातो. परिणामी दिवाळीच्या सणाला ग्राहकांच्या गर्दीने फटका बाजार फुलतो.
. येथील फटाका बाजारात विविध प्रकारचे आकर्षक फटाके मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदीसाठी येत आहे. यामुळे गावातील काहींना रोजगार उपलब्ध होत आहे. विसापूर सोबत नांदगाव (पोडे) फटाका मार्ट म्हणून नावारूपाला येत आहे. विशेष म्हणजे येथील फटाका बाजारात विविध प्रकारचे फटाके ठोक भावाचे फटाके चिल्लर किंमतीत मिळत असल्याने ग्राहकांचे समाधान होत आहे. यावर्षीच्या फटाका बाजाराला महागाई ची किणार असली, तरी दिवाळी सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी फटाके विक्री जोमाने होत असल्याचे विवेक नंदूरकर, भूपाल बोरकर, विनोद बुटले, देवराव चनेकर, राजू भालशंकर यांनी म्हटले आहे. विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शेजारी भरणारा फटाका बाजार दिवाळी सणाच्या दरम्यान चांगलाच गजबजून आहे. ग्राहकांच्या भेटीने व फटाके खरेदीच्या उत्साहाने विक्रेते सुखावले आहे.
आजघडीला ग्राहकांना महागाई ने ग्रासले आहे. मात्र, सण साजरे करावेच लागते. फटाका बाजार आहे. या बाजाराला ग्राहकांची पसंती आहे. म्हणून आम्हाला नाममात्र नफा ठेवून विविध प्रकारचे फटाके विक्री करावे लागत आहे. आमच्या गावातील फटाका बाजाराचे नावलौकीक सर्वदूर असल्याने आम्ही ग्राहकांना माफक दरात फटाके विक्री करत आहे. एक फटाके विक्रेता, विसापूर


